5 मार्च - आज दिनविशेष
![]() |
5 मार्च आज दिनविशेष 5 March |
5 मार्च - जागतिक समता दिन
1512 : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर यांचा जन्म.1558 : फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.
1666 : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
1851 : ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना झाली.
1913 : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
1931 : दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला.
1982 : आजच्या दिवशी “वेनेरा १४” या अवकाशयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला.
1985 : कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.
1997 : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.
1997 : धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
1999 : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड.
2000 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट – २) राष्ट्राला अर्पण.
2007 : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना.
Comments
Post a Comment